⚜️विद्याधन उपक्रम - आरोग्य स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये⚜️

       

      स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये


 स्वच्छता पाळा, रोगराई टाळा.

जिथे स्वच्छता असे, तिथे आरोग्य वसे.

कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू मनावर.

कचरा करूनी कमी, आरोग्याची मिळेल हमी.

गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र.

परिसराची करू सफाई, आरोग्याची होईल कमाई.

सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैंदाशीला घाला आवर.
     
हगवण, अतिसार रोगाचा प्रसार, हे तर दूषित पाण्याचे प्रहार.

उघड्यावर शौचास बसु नका, रोगांना आमंत्रण देऊ नका.

परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल.

स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू.

 पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा.

पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.

नका बसु उघड्यावर संडासाला, संधी मिळेल रोगाराई पसरण्याला.

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.

पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे, दूषित करू नका तुमच्या हाताने.

स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र, ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.

ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता.

रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.

पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.

पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू .

स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.

वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति.

नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधि पोटाची.

असेल दृष्टी, तर दिसेल स्वच्छ सृष्टि.

संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी.

सांडपाण्याला आळा,  रोगाराई टाळा.

स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर.

स्वच्छ सुंदर परिसरातुच, सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू.

शौचालय असेल जेथे, खरी प्रतिष्ठा येईल तेथे.

स्वच्छ घर, सुंदर परिसर, शोचखड्याचा करुया वापर.

 कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू

केरकचरा मुक्त गाव, सर्वत्र होईल नाव.

थोडी तर ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.

स्वच्छतेचे ठेवा ध्यान, स्वच्छतेनेच देश बनेल महान.

स्वच्छता हे महा अभियान, स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान.

स्वच्छतेचे करा पालन, स्वच्छ करा घराचे अंगण.

स्वच्छ सुंदर परिसरातुनच, सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

स्वच्छ शाळा करा हातांनी, सुंदर गाणी गाऊ मुखांनी.

स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर.

संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी.

स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.
                               संकलन :- औटी बबन मोहन
        जि. प.प्राथ.शाळा खांडवी,
 ता.कर्जत, जिल्हा अहमदनगर

=========================