ओळखा पाहू, मी कोण
(१)
तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही,
पण
मी तुम्हाला डोळ्यांना दिसत नाही - हवा
(२)
कडू आहे, गोड आहे की आहे आंबट ,
मी सहज सांगेन की आहे ते
तिखट -जीभ
(३)
इटुकल पिटुकलं दाराला लटकलं
चावी शिरता पोटात, पटकन उघडलं - कुलूप
चावी शिरता पोटात, पटकन उघडलं - कुलूप
(४)
एका पासून बारा इतकी असते याची धाव
भिंतीवरती, हाती शोभे आठवते का नाव ? - घड्याळ
भिंतीवरती, हाती शोभे आठवते का नाव ? - घड्याळ
(५)
झाडावरती उंच ठिकाणी, पोटामध्ये मधूर पाणी
कोकण माझे गाव, शुभकार्याला देती भाव - नारळ
कोकण माझे गाव, शुभकार्याला देती भाव - नारळ
(६)
अंगावर पट्टे अन् उंचच माझी मान
झाडाच्या शेंड्यांची मी पाने खातो छान - जिराफ
झाडाच्या शेंड्यांची मी पाने खातो छान - जिराफ
(७)
असा सुळकन इकडे -तिकडे पळतो
मी फक्त पाण्यात राहू शकतो - मासा
मी फक्त पाण्यात राहू शकतो - मासा
(८)
बत्तीस जणांना ठेवते गुपचूप
स्वतः बोलते खूपच खूप - जीभ
स्वतः बोलते खूपच खूप - जीभ
(९)
जमिनीवर-पाण्यात राहतो,टणक
माझी पाठ
संकटसमयी अंग मी ओढून घेतो आत - कासव
संकटसमयी अंग मी ओढून घेतो आत - कासव
(१०)
डोक्यावर तुरा छान,
राष्ट्रीय पक्ष्याचा मला मान - मोर
राष्ट्रीय पक्ष्याचा मला मान - मोर
(११)
म्हणतात मला फळांचा राजा
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मज्जा - आंबा
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मज्जा - आंबा
(१२)
सुपासारखे माझे कान
शेपूट आहे फार लहान - हत्ती
शेपूट आहे फार लहान - हत्ती
(१३)
टणक कवच माझे, लाल तरी कधी पिवळे
गुलाबी मधूर मी, रसाळ दाणे आता कोवळे
गुलाबी मधूर मी, रसाळ दाणे आता कोवळे
- डाळिंब
** संकलन **
श्री.औटी बबन मोहन