एक शब्दाच्या अक्षरापासून अनेक शब्द बनविणे.
==========================================
उदाहरणार्थ :-
' समान ' या शब्दातील अक्षरे घेऊन पुढील सार्थक शब्द बनतात. मान, सन, मास, मानस,नस .
खालील असे मूळ शब्द व त्यापासून बनविलेले सार्थक शब्द दिले आहेत.
अशा प्रकारे शब्द देऊन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा. व शब्द संपत्ती वाढवावी.
(१) तलवार
-- वाल, वार, वात, तर, तवा, रवा, तरल.
(२) आठवडा -- आठ, वडा, आठव, डाव, आव.
(३) सरपण -- सर, पण, सण, रण, रस, पसर.
(४) गायरान -- गाय, रान, गान, गारा.
(५) यवतमाळ -- माळ, तळ, तव, मात, माय, वय.
(६) नवनीत -- नव, वनी, वन, वतन, तन.
(७) हवामान -- हवा, मान, वान, नवा.
(८) नागपूर
-- नाग, पूर, नार, गर , पू.
(९) पसरट -- पर , सर, पट, टर, रस, सट, पसर.
(१०) वासरू -- वास, सरू, वारू.
(११) अहमदनगर -- अहमद , नगर, नर , नग , मन, मदन, मगर, दम, हरण, गरम.
(१२) ताजमहाल -- ताज, महाल, हाल, महा, ताल, जहाल, लता, मल.
(१३) महाभारत -- महा, भारत, भार, मत, भात, हात, मर, रहा.
(१४) यशवंतराव -- यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश, रात, वय.
** संकलक **
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
केंद्र- सडे, ता.- राहुरी, जि.अहमदनगर
=====================================================================