⚜️विद्याधन उपक्रम - सामान्य विज्ञान - शास्त्रीय उपकरणे व त्यांचे उपयोग ⚜️


*विद्याधन - उपक्रम*   
विषय :- सामान्य विज्ञान 
शास्त्रीय उपकरणे व  त्यांचे उपयोग 

 खाली काही शास्त्रीय उपकरणे दिली आहेत. तुम्हाला त्यांचे उपयोग सांगायचे आहेत.

(१) स्टेथेस्कोप

(२) थर्मामीटर

(३) सीस्मोग्राफ

(४) रडार

(५) फॅदोमीटर

(६) अॅनीमोमीटर

(७) मायक्रोमीटर

(८) मायक्रोस्कोप

(९) रेनगेज

(१०) लॅक्टोमीटर

(११) फोटोमीटर

(१२) मॅनोमीटर

(१३) केसोग्राफ

(१४) हॅचरर

(१५) ओडोमीटर

(१६) अल्टीमीटर

(१७) कॅलरीमीटर
*संकलक*
श्री.औटी बबन मोहन
(पदवीधर प्राथमिक शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा – जांभळी
केंद्र – सडे, ता. राहुरी, जि. अहमदनगर
📞 ९४२१३३४४२१

उत्तरे : - 
(१) हृदयाची स्पंदने मोजणे.
(२)  शरीराचे तापमान मोजणे.
(३) भूकंपाची तीव्रता मोजणे. 
(४) आकाशातील वस्तूची दिशा, स्थान दर्शविणे.  
(५) समुद्राची खोली मोजणे.
(६) वा-याचा वेग मोजणे
(७)  सूक्ष्म अंतर मोजणे.
(८) सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे.
(९) पर्जन्य मापन करणे.
(१०) दुधाची शुध्दता मोजणे.
(११)  प्रकाशाची तीव्रता मोजणे.
(१२) वायूचा दाब मोजणे. 
(१३) वनस्पतीची वाढ मोजणे. 
(१४) अंडी उबवणे. 
(१५) वाहनाचा वेग मोजणे. 
(१६)  समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे.
(१७) उष्मांक मोजणे.