⚜️कष्टाचे फळ⚜️
एका
गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण, त्याची
पाच मुले ही खूप आळशी होती . कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या
गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही
माझी मुले काहीच करणार नाही सर्व संपत्ती फुकट जाईल, म्हणून
त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा
तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे. ते सर्व सोने
तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा. शेतकरी
गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण, शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी
शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले. त्यांनी ते धान मार्केटला
विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली
तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन.
तात्पर्य :- खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते .