⚜️अतृप्त मन⚜️

 ⚜️अतृप्त मन⚜️


    हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला.
     लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.

तात्पर्य:- कुठलेही, कसलेही दिवस आले तरी, अतृप्त मनाच्या माणसाचे समाधान कधीच होत नाही.