⚜️बातमी क्र.२⚜️

 बातमी क्र.२
  
खाली दिलेली बातमी काळजी पूर्वक वाचा. त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायतून शोधा.



राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी

नवी दिल्ली : स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच याठिकाणी स्वच्छतागृह व उपाहार गृह यांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

१) प्लॅस्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे?
१) स्वच्छ भारत सुंदर भारत
२) स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक
३)स्वच्छ भारत आमचा भारत
४)स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक

२) मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिल्या गेले?
१) स्वच्छता ग्रह,
२) उपहारगृह
३) प्लास्टिक वस्तू
४) पर्याय १ व २

३) मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली
१) 3 ऑक्टोबर
२) 31 जुलै
३) 2 ऑक्टोबर
४)एक ऑगस्ट