⚜️बातमी क्र.३⚜️


बातमी क्र.३ 


खाली दिलेली बातमी काळजी पूर्वक वाचा. त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायतून शोधा.


कैद्यांच्या मानसिकतेत बदल
             ठाणे दिनांक 19 जानेवारी:- ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक 12 ते 18 जानेवारी 2018 या कालावधीत गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती . व्याख्यानातील विषयांवर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली गेली. कैद्यांच्या उत्तर पत्रिकांतून कैद्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र फरक पडलेला दिसून. कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगली वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.

१) वरील बातमी कोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती?
१)  कैद्यांच्या जीवनावर
२)  कारागृहावर
३) सर्वोदय कार्यकर्त्यांवर 
४) गांधीजींच्या जीवनावर

२) कायद्यांची लेखी परीक्षा घेतल्याने............................
१) त्यांचे वर्तन बिघडले                              
२) त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही
३) त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला  
४) गुन्हेगारीमध्ये वाढ झाली

३) व्याख्यान माला कोठे आयोजित करण्यात आली होती?
१) ठाण्यामध्ये                                  
२) कारागृहात
३) ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात     
४) सर्वोदय मंडळाच्या कार्यालयात

४) व्याख्यानमाला कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती?      
१) 12 ते 18 जानेवारी 2008    
२) 12 ते 18 जानेवारी 2019        
३) 18 ते 12 जानेवारी 2018   
४) वरील पैकी नाही

५) कारागृहातून बाहेर पडल्यावर कसे  वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.?
१) चांगले                                      
२) वाईट
३) नेहमीचे                                    
४) सर्वतोपरी चांगले