⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती⚜️


️ *विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* 

*खालील दिलेल्या प्रत्येक वाक्यात एका फुलाचे नाव दडलेले आहे. त्या फुलांची नावे शोधून तुमच्या वहीत लिहा.*         

1)    गण्याची म्हातारीच मेली आहे ना तपासून पहा.-
2)   किती वेळा सांगितलयं जरा तग धरत जा-
3)   मोठा मोठा गरा खूपच गोड होता.-
4)  मनीचा फारच बाई पसारा-
5)  सोनाली जा जरा ईकडे तिकडे शोध चेंडू कुठे गेला.-
6)   खजुर सईकडे मागितलास तरी चालेल.-
7)  बागुल बुवाने छडीचे तुकडे तुकडे करून टाकले.-
8)   नवीन साहेब कुलकर्णी आडनावाचे आहेत.-
9)   नानासाहेब आरोग्याला जपा आता.-
10) दुपारी जातककथा वाचायला हरकत नाही.-
11)  पुण्यात सतराशे साठ रसवंती गृह आहेत.-
12) शाळेत झेंडा वंदनाला दगडू गेला नाही.-
13) बंगाली रसगुल्ला लाजवाब असतो.-
14)  मधुकडचा खारा माल भलतीकडेच उतरविला.-
15)  जर तुम्ही बेरीज चुकलात तर रामानुज शिक्षा करतील.-
16) मदनला सर्दीवर रामबाण उपाय सापडला.-
17)  रोजनिशी लिहीण्याचा सुगंधाला फारच कंटाळा येतो
18) पिनाक मळकट कपड्यानेच सगळीकडे फिरतो.-
19) सदासर्वदा चूकीचे म्हणले मग काय बाईंनी फुलीच मारली.
20)  काय गो जाधवांचा लंबकर्ण दिसला का तुला ? -


*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  *9421334421*
 babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
     ==============================================
उत्तरे :- 1)चमेली, 2)तगर, 3)मोगरा, 4)चाफा, 5)जाई, 6)जुई, 7)गुलछडी, 8)बकुल, 9)जपा(जास्वंद), 10)पारिजातक, 11)शेवंती, 12)झेंडू, 13)गुलाब, 14)मधुमालती, 15)जरबेरा, 16)मदनबाण, 17)निशीगंध, 18)कमळ, 19)सदाफुली, 20)गोकर्ण