⚜️ *विद्याधन गणित उपक्रम – भौमितिक आकृती* ⚜️
===============================================================
*संकलक* :श्री. बबन मोहन औटी. पदवीधर प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा जांभळी, केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
===============================================================
● खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून तुमच्या वहीत
लिहा.
1.
त्रिकोणाला किती बाजू असतात ?
2.
आयताला किती
बाजू असतात ?
3.
चौरसाला किती
बाजू असतात ?
4.
त्रिकोणाला
किती शिरोबिंदू असतात ?
5.
आयताला किती शिरोबिंदू असतात ?
6.
चौरसाला किती
शिरोबिंदू असतात ?
7.
चौरसाच्या
सर्व बाजू कशा असतात ?
8. इष्टिकाचितीच्या कडांची संख्या किती ?
9.
इष्टिकाचितीच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या
किती ?
10. इष्टिकाचितीला
एकूण किती पृष्ठे असतात ?
11. घनाच्या कडांची संख्या किती ?
12. घनाच्या चौरसाकार
पृष्ठांची संख्या किती ?
13. घनाला किती शिरोबिंदू असतात ?
14.काटकोनाचे माप किती अंशाचा
असतो ?
15. त्रिकोणाच्या सर्व
बाजूच्या लांबीच्या बेरजेला काय म्हणतात ?
16. वर्तुळावरील कोणतेही
दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात
?
17. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक
बिंदू जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात ?
18. वर्तुळाच्या
केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा काय म्हणतात ?
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421
==========================================================
उत्तरे :- 1)३ ( तीन ), 2) ४ (चार ), 3) ४ ( चार ) , 4) ३ (तीन ), 5) ४ (चार
), 6) ४ (चार), 7) समान, 8) १२ (बारा ), 9)८ (आठ ), 10) ६ (सहा ), 11)
१२ (बारा ), 12)
६ (सहा ), 13)
८ (आठ ), 14) ९० अंश,
15) परिमिती, 16) जीवा, 17)
वर्तुळाची त्रिज्या, 18) व्यास