⚜️बातमी क्र.१⚜️


बातमी क्र.१


खाली दिलेली बातमी काळजी पूर्वक वाचा. त्याखाली दिलेल्या 

प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायतून शोधा.

  क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश
जळगाव 6 ऑक्टोबर: “एकाग्रताʼ कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही शेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल” ,असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला प्रसंग होता. येथील आदर्श विद्या मंदिर ʼच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
           आदर्श विद्यामंदिर चा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला. साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते .कबड्डी खोखो लंगडी सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाची ही सामने भरवले गेले होते .सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्या यांचा खास उल्लेख केला सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. ती मैदान तुडुंब भरले होते क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदी झाले होते.

१) क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे ?
१) सुनील गावस्कर     
२)  सचिन तेंडुलकर
३) महेंद्रसिंह धोनी        
४) राहुल द्रविड

२) यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नाही?
१) एकाग्रता             
२) कष्ट       
३) निष्ठा      
४) आळस

३) सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते .?
१) शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला  
२) विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला
३) आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला
४) सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून

४) वरील जाहिरातीत कोणत्या कार्यक्रमाचे वर्णन आले आहे .?
१) वाढदिवस   
२) विवाह   
३) उद्घाटन   
४) क्रीडा महोत्सव

५) वरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते ?
१) सचिन तेंडुलकर 
२) विद्यार्थी  
३) गावकरी   
४) पालक