कविता क्र. १
खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.
भारत अमुचा देश सुंदर, भारत अमुचा देश
धर्म निराळे, पंथ निराळे, जरी वेगळे देश
विविधतेतही इथे एकता
बंधुभाव रुजली समता
वैविध्याने नटलेला हा सुंदर रम्य प्रदेश
फळाफुलांचा, दरीखोऱ्यांचा
हिरवी कुरणे, धनधान्याचा
विपुल वैभवे एकत्वाचा एकचि अभिनिवेश
वेगवेगळ्या इथल्या भाषा
चालीरीतीही भिन्न जराशा
काळी माती अमुची आई, ना भेदभाव लवलेश
1) आमच्याकडे काय रुजले आहे ?
1) बंधुभाव
2) समता
3) चालीरीती
4)
निराळे पंथ
2) कवीने आई कोणाला म्हटले आहे ?
1) भाषेला
2) चालीरीतीला
3) हिरव्या कुरणांना
4) काळ्यामातीला
3) वरील कवितेते कुरुप या शब्दाचा विरुध्दार्थी कोणता शब्द कवितेत आला आहे ?
1) वेश
2) सुंदर
3) एकता
4) छान