⚜️कविता क्र. २⚜️

कविता क्र. २

खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.

शूरवीर आम्ही मुले, देशासाठी देऊ प्राण।
मिळून सारे वाढवू शान, गातो स्वातंत्र्याअचे गान ॥
विसरलो आम्ही जातीपाती, माय अमुची काळी माती।
तिची मुले आम्ही छान, करु देशासाठी बलीदान ॥
परमवीर सैनिक होऊ,लढा देशासाठी देऊ।
वाढवू भारतभूची शान, गातो स्वातंत्र्याचे गान॥
मुले आम्ही लहान, ध्येय परी महान।
होऊ सारे शक्तीमान, गातो स्वातंत्र्याचे गान॥


१) वरील कवितेत माय कोणाला म्हटले आहे ?
१) कवीच्या आईला                    
२) मुलांच्या आईला       
३) काळ्या मातीला                   
४) शूरवीरांच्या आईला

२) सैनिकाला काय व्हायचे आहे ?
१) अमर                       
२) कर्नल           
३) परमवीर    
४) मुले

३) मुले कशाचे गीत गात आहेत ?
१) सैनिकांचे       
२) स्वातंत्र्याचे   
३) भारतभूमीचे   
४) काळ्या मातीचे