⚜️कविता क्र. ३⚜️

कविता क्र. ३


खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.
जात्यामध्ये गहू भरडले, डाळ हरभरा ज्वारी पिसली
तेंव्हा आईच्या ओठामधूनी, सुंदर ओवी सहज स्फुरली ॥१॥
नादमयी ती पहाट होता, मंजूळ ओवी कानी पडता
अंगी मोरपीस सहज फिरतसे, अलगत मजला जाग येतेसे॥२॥
घरात नाही जाते आता, पिठ मिळते दुकानी जाता
चक्की घरघर घरात फिरते, सुंदर ओवी रुसून बसते॥३॥

१) आईची ओवी कानावर पडल्यावर कसे वाटते ?
१) रेडिओवर गाणे ऐकल्याप्रमाणे                   
२) अंगावर मोरपीस फिरल्यासारखे
३) जात्याच्या आवाजासारखे                         
४) कंटाळवाणे

२) आईला ओवी केंव्हा स्फुरते ?
१) जात्यावर दळताना                                 
२) काम करताना
३) निवांत बसल्यावर                                     
४) बाळाला उठवताना

३) आज जाती घरात नाहीत म्हणून काय घडले ?
१) आईला दळता येत नाही                             
२) आपल्याला उठविण्यास गजर लागतो
३) आई लवकर उठते                                    
४) ओव्या म्हटल्या जात नाही.