⚜️कविता क्र. ४⚜️


कविता क्र.4  

खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.

रात्रवेळी घरट्यात चिमणीच्या पंखाखाली
मऊ मऊ बिछायत बाळे तिथे झोपलेली
मुके काजव्यांचे दिवे अंधारात लुकलुक
उजळती पान-पान निवारती धाकधूक
पहाटेस मोतीदार थेंब दवाचे निर्मळ
पानांवर पहारा ते करतात लाडिवाळ
रंगलेल्या नभातून सूर्यदेव डोकावतो
बाळा वत्सल हातांनी हलकेच जाणवतो

१) घरट्यात चिमणीच्या पंखाखाली कोण झोपले आहे ?
१) चिमणी         
२) चिमणीची पिले       
३) काजवे          
४) सूर्यदेव

२) पानांवर पहारा कोण देते ?
१) मोती             
२) काजवे                      
३) दवांचे थेंब   
४) चिमणी

३) काजव्यांच्या दिव्यात कोण उजळून निघाले आहे ?
१) अंधार           
२) पाने                         
३) घरटे             
४) बाळ