⚜️कविता क्र. ५⚜️


कविता क्र. 5

खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.

जगण्याची स्पर्धा ही एक ; अनोखीच स्पर्धा असते,
जगण्याची स्पर्धा कधी ; कोणालाही चुकत नसते
या स्पर्धेत नुसते ; धावायचे आणि धावायचेच असते
प्रत्येकाला या स्पर्धेत ; उतरायचे असते
ही स्पर्धा लावायची ; असते अभ्यासाची,
मोठे होण्याची ; चांगले नागरिक होण्याची
स्पर्धा लावावी ; प्रत्येक चांगल्या वाईट
कडू गोड क्षणांची ; स्पर्धा लावावी जगण्याची
जगण्याची आणि जगण्याचीच

१)‘स्पर्धेत उतरणे’ या शब्दसमूहातील ‘उतरणे’ या शब्दाचा कोणता अर्थ कवितेत आला आहे ?
१) खाली येणे                             
२) सहभागी होणे                    
३) स्पर्धेतून खाली येणे                 
४) सर्व पर्याय बरोबर

२) स्पर्धा कोणाशी लावावी ?
१) तिखट - अंबट क्षणाशी            
२) सुख दु:खाशी
३) कडू - गोड क्षणांशी             
४) श्रीमंतांशी

३) वरील कविता कोणत्या स्पर्धेविषयी सांगते ?
१) धावण्याच्या                           
२) अभ्यासाच्या             
३) कडू,गोड क्षणांच्या                  
४) जगण्याच्या