⚜️कविता क्र. ६⚜️


कविता क्र. 6

खाली दिलेली कविता काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्नासमोरील चौकटीत लिहा.

प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तत्व असतं
दु:खामुळेच तर सुखाला महत्व असतं
दु:खामुळेच तर माणसाला अनुभव येतात
दानवामुळेच तर देव अवतार घेतात
दु:ख कितीही असो गोंधळून जायचं नसतं
क्षणिक सुखाने माणसाने हुरळून जायचं नसतं
जीवन जगताना दु:खाला महत्व द्यायचं नसत।
संकटकाळातही ‘सत्व’ जाउ द्यायचं नसतं

१) संकट काळात माणसाने काय जावू द्यायचे नसते ?
१) तत्व             
२) महत्व           
३) सत्व                    
४) ममत्व

२) माणसाला अनुभव कशामुळे येतात ?
१) सुखामुळे                                                   
२) दु:खामुळे
३) जीवन जगताना घडणाऱ्या घटनेमुळे                 
४) देव - दानव यांच्या कृपेमुळे

३) देव कशासाठी अवतार घेतात ?
१) सुखाची निर्मिती करण्यासाठी                           
२) दु:ख नष्ट करण्यासाठी
३) दानवांचा नाश करण्यासाठी                        
४) दानवांना मदत करण्यासाठी