उतारा क्र. १
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.
“आणि असल्या गलिच्छ जागी तुम्ही तिची उत्तराची व्यवस्था केली ? अरे साधा पाहुणा आला, तर आपण दिवाणखाना किती स्वच्छ झाडतो. बिछायत टाकतो. सारं घर सारवतो आणि सरस्वती म्हणजे केवढी मोठी पाहुणी ! तुम्ही सारी शाळा अशीच न झाडता ठेवलीत ?”
एवढे बोलून बाबांनी शाळा झाडायला सुरुवात केली . गावचे शंभर हात लागले. पंधरा मिनिटात सारी शाळा, खेळाचे अंगण, एवढेच नव्हे तर शाळेपुढचा रस्तादेखील झाडून स्वच्छ झाला आणि सारे कसे हसतखेळत !
खेड्यातल्या लोकांशी हास्यविनोद करीत बोलणाऱ्या विनोबाजींना पाहिले, म्हणजे रात्री तीन वाजता उपनिषदांसारख्या महान ग्रंथांची उपासना करणारा, तो कठोर वाटणारा महर्षी हाच का, अशी शंका येते ?
प्रश्न १:- कोण पाहुणी आली होती ?
१) लक्ष्मी
२) विद्यादेवी
३) शाळेतील मुली
४) सरस्वती
प्रश्न २ :- शाळा झाडायला कोणी सुरुवात केली ?
१) आजोबांनी
२) शिपायाने
३) विनोबाजींनी
४) महर्षींनी
प्रश्न ३ :- कोणती जागा गलिच्छ होती ?
१) गावातील
२) शाळेची
३) रस्त्यावरची
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421
४) दिवाणखान्यातील