⚜️उतारा क्र. २⚜️


उतारा क्र. २       
  खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचात्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेतयोग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.


        निसर्गावर दिलखुलास प्रेम करणारे कवी म्हणजे  ‘बालकवी ठोंबरे’ होय. बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या गावी १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींचे जीवन तसे खानदेशच्या खेड्यापाड्यांतच गेले. म्हणूनच बालकवींनी बऱ्याचशा कविता निसर्गावरच लिहिल्या आहेत. निसर्ग हे त्यांचे जीवन होते. अशा प्रकारे निसर्गाशी नाते जोडणारे हे कवी. तुम्हाआम्हास जे दिसते तेच त्यांनी आपल्या कवितेतून टिपले. बालकवी सांगून जातात आपल्या ‘गाणे’ या कवितेतून जीवनाचा अर्थ -
‘माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, नित्याचे गाणे ॥
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता, हे माझे गाणे ॥

प्रश्न १:-   बालकवींनी ‘गाणे या कवितेतून काय सांगितले ?
       १) निसर्गाचे महत्व    
       २) जीवनाचा अर्थ        
       ३) मंगल गाणे    
       ४) विश्वाची एकतानता

प्रश्न २ :-  बालकवींनी आपल्या कविता निसर्गावरच का लिहिल्याकारण ……
         १) त्यांना निसर्गाची आवड होती.                     
         २) निसर्ग हे त्यांचे जीवन होते.
         ३) ‘निसर्ग’  विषय सोपा होता.                      
         ४) त्यांचे जीवन खेड्यापाड्यांत गेले.


प्रश्न ३ :- कल्याण’ या शब्दाला समानार्थी कोणता शब्दबालकवींच्या कवितेत आला आहे ?
             १) एकतानता           
             २) नित्याचे        
             ३) मंगल         
             ४) अक्षय