उतारा क्र. ३
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.
गुरुवर्य रवीद्रनाथ टागोर हे वृक्षःदिंडीचे आद्य प्रवर्तक
होते. वृक्षराजीने वेढलेल्या निसर्गरम्य शांतीवनाच्या परिसरातील अध्ययन आणि अध्यापन हे पूर्वीच्या आश्रम शिक्षणाचे सुधारित रुपच होते. हे निसर्गवादी शिक्षणतज्ञ निसर्गशिक्षणाचे महत्व जाणून होते. जगदीशचंद्र बसू यांनी वनस्पतींची मानव किंवा प्राणी सदृश्य संवेदनक्षमता जगाच्या प्रत्ययाला आणून दिली. गौतम बुध्दांना शांत विशाल वृक्षाखाली आत्मज्ञान झाले. तो वृक्ष ‘बोधिवृक्ष’ म्हणून सुविख्यात आहे. वृक्षपूजनाचे महत्व पुराणातही आहे. वटपूजा, आवळीभोजन, चैत्रप्रतिपदेच्या दिवशी कडूनिंबाचा मोहोर भक्षण करणे; तसेच आम्रपल्लवाची तोरणे, केळीचे पाने, आघाडा, केना यांची पाने या सगळ्यांना प्रासंगिक वा नित्य जीवनात महत्वाचे स्थान मिळालेले आहे. आपल्या वृध्दापकाळी आपल्या नातवांकरीता आंब्याचं झाड लावणाऱ्या दूरदृष्टीच्या आजोबांची गोष्ट आजही आपण लक्ष्यात ठेवली पाहिजे. तिचा अवलंब केला पाहिजे, एक मोठा वृक्ष तोडण्यापुर्वी इतर दहा झाडे लावा.
प्रश्न १ :- वरील उताऱ्यात निसर्गवादी शिक्षणतज्ञ कोणाला म्हटले आहे ?
१) गौतमबुध्द
२) जगदीशचंद्र बसू
३) रविंद्रनाथ टागो
४) न्यामूर्ती रानडे
प्रश्न २ :- गौतमबुध्दांना कोणत्या वृक्षाखाली आत्मज्ञान झाले ?
१) आम्रवृक्ष
२) बोधिवृक्ष
३) कडूनिंब
४) केळी
प्रश्न ३ :- वरील उताऱ्यातून आपण कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा ?
१) झाडे तोडावीत
२) वृक्ष लावण्याला प्रतिबंध करावा
३) एक झाड तोडण्यापूर्वी दहा झाडे लावावी
४) वृक्षदिंडीचे आयोजन करावे.