उतारा क्र. ४
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.
थंडीचे दिवस संपले की,
ऋतूराज वसंताचे आगमन होते. फाल्गुन
महिन्यातील होळी संपते, न संपते तोच वसंत ऋतूची चाहूल लागते. वसंत ऋतू लागताच कोकीळ
पक्षी आपल्या गायनाला सुरुवात करतो. ऋतूराजाच्या आगमानाने अवघ्या सृष्टीचा
कायापालट होतो. धरती आणि आकाशात नव्या नव्या रंगाची उधळण होते. काजू, शेवगा यांवरील
फुललेली फुले हळूच कुजबुजतात. जाई,
जुई,
सायली,
मोगरा,
चाफा अशा अनेक फुलांचा सुगंध दरवळतो.
म्हणूनच वसंतऋतूला ‘ऋतूंचा राजा’ म्हणतात.
प्रश्न १:- वसंतऋतू कोणत्या मराठी महिन्यांमध्ये येतो ?
१) फाल्गून, चैत्र
२) चैत्र, वैशाख
३) वैशाख,
ज्येष्ठ
४) ज्येष्ठ, आषाढ
प्रश्न २ :- ‘धरणी’
या शब्दाच्या समान अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यात आला?
१) भूमी
२) आकाश
३) धरती
४) सृष्टी
प्रश्न ३ :- वरील
उताऱ्यात किती फुलझाडांचा उल्लेख आला आहे ?
१) सात
२) सहा
३) पाच
४) चार