⚜️उतारा क्र. ५⚜️


उतारा क्र. ५ 
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचात्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेतयोग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.

      ज्ञानाचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. सदगुण धारण करण्यासाठी ज्ञान एक आवश्यक माध्यम आहे. जिथे ज्ञान नाही, तिथे सदगुण नाही. ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा संग्रह नाही. ज्ञान म्हणजे निरपेक्ष आदर्श विचार. ज्ञानामुळेच मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. ज्ञान केवळ आनंद निर्मीती प्रक्रियेबरोबर मर्यादीत राहत नाही. त्याचा उपयोग निर्माण केलेला आनंद ग्रहण करण्यासाठी सुध्दा होत असतो. शिवाय ज्ञानामुळे दु:ख दूर सारता येते. ज्ञान म्हणजे केवळ चर्चा करण्याचे साधन नाही. ती एक आत्मसात करण्याची प्रक्रिया आहे. हा सगळा आनंद शिक्षणातून मिळतो, म्हणून शिक्षण महत्वाचे. शिक्षण ही कामधेनूच आहे. अशा बहुपयोगी शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शिक्षणामुळे वैयक्तिक जीवनात तर यश मिळू शकतेच, परंतू आपला देशही जगात दैदिप्यमान यश मिळवू शकतो.
    प्रश्न १:- मानवी जीवनामध्ये कशामुळे आनंद निर्माण होतो ?
           १) सदगुण                      
           २) ज्ञान                        
           ३) शिक्षण                      
           ४) आदर्श विचार

प्रश्न २ :-  शिक्षण ही ------------ आहे ?
             १) जीवन प्रक्रिया 
             २) यशाचे गमक             
            ३) कामधेनू                  
             ४) ज्ञानगंगा
प्रश्न 3:-   शिक्षणामुळे काय फायदा होईल ?
              १) देशाचे राहणीमान वाढेल                                  
              २) देशाची प्रगती होणार नाही
              ३) देशात ज्ञानाची वाढ होईल.                               
              ४) देश ह जगात यश मिळवेल.