उतारा क्र. ६
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.
पक्ष्यांपेक्षा पशूंची बुध्दी
जास्त असते. कोल्हा हा चतुर समजला जातो.
वाघ कावेबाज व घातकी असतो. सिंह दुसऱ्याने मारलेले जनावर सहसा खात नाही; तो सरळ वृत्तीचा असतो, कावेबाज नसतो. हत्ती
हुशार असतो, किंबहुना सर्व पशूत बुध्दीमान म्हणून त्यालाच पहिला मान द्यावा
लागतो; मात्र तो चिडखोर व खुनशी असतो. घोड स्वभावाने उमदा, स्वामीनिष्ठ, इमानी व सेवाभावी
असतो. कुत्र्याबद्दल तर सांगायलाच नको. राखण करणे,
वासावरून माणुस शोधणे; वगैरे बरेच कामे
कुत्रा करतो, माणसाचा खराखुरा साथी कुत्राच.
प्रश्न 1 :- हत्तीच्या स्वभावातील दोष कोणता?
प्रश्न 1 :- हत्तीच्या स्वभावातील दोष कोणता?
1) तो कावेबाज असतो
2) तो चिडखोर व खुनशी असतो
3) तो घातकी असतो
4) तो बुध्दीमान असतो.
प्रश्न 2 :-निष्ठावंत, प्रामाणिक व सेवा
करणारा प्राणी कोणता ?
1) कोल्हा
2) वाघ
3) घोडा
4) हत्ती
प्रश्न 3:- वासावरुन
माणुस शोधण्याचे काम कोण करु शकतो ?
1) वाघ
2) घोडा
3) कुत्रा
4) कोल्हा