उतारा क्र. ७
खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो. जो दहा वर्षाचा विचार करतो, तो
झाडं लावतो. जो आयुष्याचा विचार करतो. जी माणसं – माणसं जोडतात, ती आयुष्यात यशस्वी होतात. एकटा माणुस आयुष्यात काय करु शकतो, तुम्ही कितीही हुशार असलात, कितीही बलवान असलात, तरी तुम्हाला काही यश मिळवायचं असेल, तर इतर अनेकांची साथ मिळावी लागते. खरं म्हणजे ती तुम्हाला मिळवावी लागते. माणसं जोडण्यासाठी फार काही कष्ट करावे लागत नाहीत. केवळ गोड अस्थेने चार शब्द बोलले तरी माणसे जोडली जातात.
प्रश्न 1:- माणूस जोडणाऱ्याबद्दल काय घडते ?
1) तो एका वर्षाचा विचार करतो
2) तो आयुष्यात यशस्वी होतो.
3) तो आयुष्याचा विचार करतो
4) तो दहा वर्षाचा विचार करतो.
प्रश्न 2:- जो दहा वर्षाचा विचार करतो तो काय करतो ?
1) धान्य पेरतो
2) माणसे जोडतो
3) गोड बोलतो
4) झाडे लावतो
प्रश्न 3:- माणसं कशी जोडली जातात ?
1) खाऊ दिल्याने
2) केवळ गोड, अस्थेने चार शब्द बोलण्याने
3) कष्ट करण्याने
4) विचार करण्याने.