⚜️उतारा क्र. ८⚜️


उतारा क्र. ८

खाली दिलेला उतारा काळ्जीपूर्वक वाचात्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेतयोग्य उत्तराची निवड करुन त्याचा पर्याय क्रमांक प्रश्ना समोरील चौकटीत लिहा.


      दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘मकरसंक्रांत’ हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण पाळला जातो. संक्रांत आणि भोगी या दिवशी तीळ आणि गूळ या पदार्थांना फार महत्व असते . या दिवशी तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याचे भरीत असा खमंग बेत असतो. थंडीच्या दिवसात हा उष्णतावर्धक आहार शरीराच्या दृष्टीने फार फायद्याचा ठरतो. म्हणून या दिवसात तयार होणारा हरभरा,ऊस, बोरं, तिळगूळ यांचा उपयोग संक्रांत वाणात केला जातो. या दिवशी एकमेकांना तिळगूळ वाटतात. तिळगूळ देऊन जुनी भांडणे मोडीत काढतात. संक्रांतीच्या काळात वातावरण आल्हाददायक असल्याने काही ठिकाणी आकाशात मोठेमोठे पतंग ऊडवून लोक आनंद लुटतात.

  प्रश्न 1 :-    संक्रांतीच्या दिवशी लोक काय करतात ?
         1) फटाके वाजवतात.                  
         2) झोका खेळतात                                  
         3) भांडणे करतात.                      
        4) पतंग उडवून आनंद लुटतात.      
    
    प्रश्न 2 :- संक्रांत हा सण ग्रेगरियन वर्षातील कितव्या महिन्यात साजरा करतात ?
         1) तिसऱ्या                    
         २) चौथ्या                       
         3) पहिल्या       
         4) शेवटच्या

   प्रश्न 3 :- संक्रांत आणि भोगीच्या दिवशी कोणत्या पदार्थांना महत्व असते ?
        1) लाडू व पेढे                
        2) तीळ आणि गूळ                   
       3) करंज्या व जिलेबी                   
       4) पुरणपोळी व भात