विज्ञान कोडे -५
शरीराचे आहे ज्ञानेंद्रिय महत्वाचे,
कार्य
आहे माझे ध्वनी ऐकण्याचे
ध्वनी लहरी येऊन पडद्यावर आदळतात,
रोमपेशी
उत्तेजीत होऊन मेंदूकडे पाठवितात
तोल सांभाळण्यास शरीराचा होते माझी मदत,
सर्वांत
लहान हाडाची असते मला सोबत
उत्तर- कान – Ear