⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व_म्हणी ⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व_म्हणी
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 =============================================
या ठिकाणी काही प्राण्यांची व पक्ष्यांची नावे दिली आहेत. त्यांच्या नावावरून किंवा ते नाव येईल अशी मराठी म्हण तुम्ही शोधून वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू तुम्ही प्रत्येक नावासाठी जास्तीत जास्त म्हणी कोण शोधतो ?
 उदा:- 
प्राण्याचे नाव  :- गाढव      
 म्हण  :-  घोडे कमावते आणि गाढव खाते     
पक्ष्याचे नाव  :- कावळा      
 म्हण  :-  कावळा बसला आणि फांदी तुटली     

1) वाघ

2) हत्ती

3) घोडा

4) कोल्हा 

5) सुसर

6) शेळी

7) कुत्रा

8) म्हैस

9) गाय

10) बैल

11) मांजर

12) उंदीर

13) गाढव

14) कावळा

15) साप

16) कोंबडा

17) उंट

18) गोगलगाय

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
=================================
उत्तरे:- 1)वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच   2)हत्ती गेला पण शेपूट राहिले / हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते  3)रडत राव घोड्यावर स्वार  4)एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला /कोल्हा काकडीला राजी  5)सुसरबाई तुझी पाठ मऊ  6)हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते  7)भीक नको पण कुत्रा आवर  8)बारक्या फणसाला म्हैस राखण  9)अडली गाय फटके खाय /एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये/ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही/गाय व्याली, शिंगी झाली/वासरात लंगडी गाय शहाणी  10)अतिशहाणा त्याचा बैल रिकामा/बैल गेला आणि झोपा केला  11)उंदराला मांजर साक्ष/मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही  12)उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी  13)अडला हरी गाढवाचे पाय धरी/गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता/गाढवाला गुळाची चव काय ? /गाढवाच्या पाठीवर गोणी/ गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ  14)उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक  15)साप साप म्हणून भुई धोपटणे  16)कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही  17)उंटावरचा शहाणा  18)गोगलगाय न पोटात पाय