⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द २ ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
खाली काही शब्द दिले आहेत. त्या प्रत्येक शब्दासाठी स या अक्षराने सुरुवात होणारा व दुसरे अक्षर जोडाक्षर असणारा समानार्थी शब्द शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा.:- शब्द :- पडसे
उत्तर :- सर्दी
1) सर्व साधन युक्त –
2) सुशील –
3) दोस्ती –
4) कठीण –
5) गुणी –
6) मजबूत –
7) चांगले काम–
8) आदरातिथ्य –
9) मानपान –
10) अधिकार –
11) अन्यायाचा प्रतिकार-
12) सार –
13) काल विभागणी –
14) वैभवकाळ –
15) चांगले विचार –
16) नीतिपरायणता –
17) एकनिष्ठ –
18) या क्षणी –
19) आठवडा –
20) विपुलता –
21) योग्य –
22) चक्राकार –
23) प्रसिद्ध –
24) ज्ञानी –
25) संपूर्ण –
26) सूचना –
27) खटपट –
28) जाणता –
29) नवनिर्मीती करणारा-
30) हीव –
31) सुजन –
32) यथार्थ –
33) व्याल –
34) राजा –
35) निरंकुश –
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
========================================
उत्तरे:- १) सज्ज, २)सच्छील, ३) सख्य, ४) सक्त, ५)सज्जन, ६) सज्जड, ७)सत्कर्म, ८) सत्कार, ९) सन्मान, १०) सत्ता, ११) सत्याग्रह, १२) सत्व, १३) सत्र, १४) सद्दी, १५) सद्बुध्दी, १६) सत्प्रवृत्ती, १७) सद्भक्त, १८) सध्या, १९) सप्ताह, २०)समृद्धी, २१) सम्यक, २२) सर्पिल, २३) सर्वश्रृत, २४) सर्वज्ञ, २५) सर्व्या,सर्व, २६) सल्ला, २७) सव्यापसव्य, २८)सज्ञान, २९)सर्जनशील, ३०) सर्द, ३१) सत्प्रवृत्त, ३२) सत्य, ३३) सर्प, ३४) सम्राट, ३५)सर्वव्यापी