⚜️ ️विद्याधन भाषिक खेळ_ शब्दातून शब्दाकडे ⚜️



⚜️ ️विद्याधन भाषिक खेळ_ शब्दातून शब्दाकडे 
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
या ठिकाणी काही शब्द दिले आहेत. प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीस किंवा शेवटी अक्षरे जोडून नवीन शब्द तयार करून ते  तुमच्या वहीत लिहा. आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू सर्वात प्रथम कोण शोधून दाखवतो?....

उदा.:-
शब्द – वास
उत्तर :- वास –निवास – श्रीनिवास – सुवास – वासरू- वासना

1) मती
2) भात
3) सिध्द
4) बुध्दी
5) ग्रह
6) हित
7) जय
8) पोर
9) मळ
10)  प्रेम


*👉संकलक👈*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
 babanauti16.blogspot.com

===================
उत्तरे:-1)मती-सुमती-मतिमंद 2)भात-प्रभात-भातशेती 3)सिध्द-प्रसिध्द-सिध्दता 4)बुध्दी-सुबुध्दी-बुध्दिमत्ता 5)ग्रह-आग्रह-ग्रहण 6)हित-अहित-हितकर 7)जय-विजय-जयवंत 8)पोर-टपोर-पोरवय 9)मळ-कमळ-मळकट 10)प्रेम-सप्रेम-प्रेमळ