⚜️️विद्याधन भाषिक उपक्रम –वाक्प्रचार व म्हणी⚜️
️शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
===============================
खेळात या ठिकाणी काही वाक्प्रचार व म्हणींचे अर्थ दिले आह. त्या दिलेल्या अर्थाचा वाक्प्रचार किंवा म्हण ओळखून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा. :-
अर्थ:- वाईटात आणखी वाईट घडणे.
उत्तर :- कशात-काय-अन-फाटक्यात-पाय
उत्तरसूची
१) अतिरेकाचा परिणाम
उत्तर :- अति तेथे माती
२) उघड दिसणाऱ्या गोष्टीची साक्ष कशाला
उत्तर :- हातच्या कांकणाला आरसा कशाला
३) तावडीत येणे
उत्तर :- कचाट्यात सापडणे
४) अत्यंत निरुपयोगी माणूस
उत्तर :- खायला काळ आणि भुईला भार
५) खूप मारणे
उत्तर :- चामडी लोळवणे
६) प्राणपणाने लढणे
उत्तर :- छातीचा कोट करणे
७) घाबरून पळ काढणे
उत्तर :- पाठ दाखवणे
८) त्रासून सोडणे
उत्तर :- सळो कि पळो करून सोडणे
९) एकमेकांशी न भेटणा-या लोकांनी एकत्र येणे
उत्तर :- आवळ्याची मोट बांधणे
१०) भांडण लावून मजा पाहणे
उत्तर :- कोंबडे झुंजवणे
११) बढाई मारणे
उत्तर :- मिशीला पीळ देणे
१२) खूप संपत्ती असणे
उत्तर :- सोन्याचा धूर निघणे
१३) गरजेपुरते गोड बोलणारा
उत्तर :- कामापुरता मामा
१४) ऐपत पाहून वागावे
उत्तर :- अंथरूण पाहून पाय पसरावे
१५) रोग एकीकडे उपाय भलतीकडे
उत्तर :- आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
१६) दोन्ही बाजूंनी सारखी अडचण
उत्तर :- इकडे आड तिकडे विहीर
१७) उतावळेपणाचे वर्तन
उत्तर :- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
१८) सगळे सारख्याच स्वभावाचे
उत्तर :- एकाच माळेचे मणी
१९) अतिशय उधळेपणा करणे
उत्तर :- ऐंशी तिथे पंचाऐंशी
२०) अल्पकाळ टिकणारी गोष्ट
उत्तर :- औटघटकेचे राज्य
उत्तर :- अति तेथे माती
२) उघड दिसणाऱ्या गोष्टीची साक्ष कशाला
उत्तर :- हातच्या कांकणाला आरसा कशाला
३) तावडीत येणे
उत्तर :- कचाट्यात सापडणे
४) अत्यंत निरुपयोगी माणूस
उत्तर :- खायला काळ आणि भुईला भार
५) खूप मारणे
उत्तर :- चामडी लोळवणे
६) प्राणपणाने लढणे
उत्तर :- छातीचा कोट करणे
७) घाबरून पळ काढणे
उत्तर :- पाठ दाखवणे
८) त्रासून सोडणे
उत्तर :- सळो कि पळो करून सोडणे
९) एकमेकांशी न भेटणा-या लोकांनी एकत्र येणे
उत्तर :- आवळ्याची मोट बांधणे
१०) भांडण लावून मजा पाहणे
उत्तर :- कोंबडे झुंजवणे
११) बढाई मारणे
उत्तर :- मिशीला पीळ देणे
१२) खूप संपत्ती असणे
उत्तर :- सोन्याचा धूर निघणे
१३) गरजेपुरते गोड बोलणारा
उत्तर :- कामापुरता मामा
१४) ऐपत पाहून वागावे
उत्तर :- अंथरूण पाहून पाय पसरावे
१५) रोग एकीकडे उपाय भलतीकडे
उत्तर :- आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
१६) दोन्ही बाजूंनी सारखी अडचण
उत्तर :- इकडे आड तिकडे विहीर
१७) उतावळेपणाचे वर्तन
उत्तर :- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
१८) सगळे सारख्याच स्वभावाचे
उत्तर :- एकाच माळेचे मणी
१९) अतिशय उधळेपणा करणे
उत्तर :- ऐंशी तिथे पंचाऐंशी
२०) अल्पकाळ टिकणारी गोष्ट
उत्तर :- औटघटकेचे राज्य
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421