⚜ विद्याधन शा.शिक्षण उपक्रम – हरवलेले शोधा⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
मुलांनो, या खेळात दिलेल्या वाक्यात काही बैठे व मैदानी खेळ लपलेले आंहेतते खेळ शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले खेळाबद्दलचे ज्ञान वाढवू शकता.
१) मकरंद बघ बाबा, कोथिंबिरीची गड्डी २० रु. एक आहे.
उत्तर :- -------------------
२) पलंग, खाट, बाजले फक्त आता खेडोपाडी दिसून येते.
उत्तर :- -------------------
३) काल पांडूतात्यांच्या गोठ्यात नवीन खिल्लारी जोडी आलीय.
उत्तर :- -------------------
४) आजकाल पंढरीच्या वारीत भक्तांचा तांडा थोपवणे अवघड झाले आहे.
उत्तर :- -------------------
५) गोपाळा, ह्या खट्याळ बंटीला आवर बाबा
उत्तर :- -------------------
६) जगज्जेता विश्वनाथन आनंद साठी बुध्दी हेच बळ आहे.
उत्तर :- -------------------
७) पूर्वी पेक्षा दसपट महागाई वाढली आहे.
उत्तर :- -------------------
८) पावसाळ्यात भुसारी कॉलनीत पाण्याचे पाट च्या पाट वाहू लागतात.
उत्तर :- -------------------
९) खो- गो गोळ्या खोकल्यावर गुणकारी आहेत.
उत्तर :- -------------------
१०) ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मलेरिया चे डास आढळतात.
उत्तर :- -------------------
११) छचोर पोरींना पब मधून पोलिसांनी पकडून नेले.
उत्तर :- -------------------
१२) जोडधंदा म्हणून साहेबरावांनी खरेतरशेळी पालन पण करावे.
उत्तर :- -------------------
१३) नर्मदा नदी सागरासारखी विशाल आहे त्यातले गोटे प्रसिद्ध आहेत.
उत्तर :- -------------------
१४) पावसाळ्यात पाण्या बरोबर दगड ,गोटे,कचरा, माती वाहून येते.
उत्तर :- -------------------
१५) पानात डाव्या बाजूला चमचाभर मीठ,लिंबू,चटणी, कोशिंबीर, लोणचे ,पापड
वगैरेवाढण्याची पद्धत आहे.
उत्तर :- -------------------
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421