⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – एका शब्दचा दुसरा अर्थ⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम - एका शब्दाचा दुसरा अर्थ

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

=================================


या ठिकाणी काही वाक्ये दिली आहेत. त्यातील रिकाम्या जागी शरिराचा कोणता योग्य येईल ते शोधून वाक्य पूर्ण करा. तसेच वाक्यात आलेल्या या अवयवरुपी नवीन शब्दाचा वाक्याला अनुसरुन अर्थ काय असेल ते आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

उत्तरसूची 


१) चुलीवरच्या तव्याची ------ काळीभोर झाली होती.
    उत्तर :- पाठ
    अर्थ :- तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू

२) कपाचा ----- कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात दिला.
उत्तर :- कान
 अर्थ :- कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी 

३) ‘हा नारळ नासका निघणार’, नारळाचा -------- बघून धनव्वा म्हणाली.
    उत्तर :- डोळा
     अर्थ :- नारळाचा डोळा म्हणजे नारळाच्या वरच्या बाजूची खोबण

४) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे ----- फुगले.
उत्तर :- पोट
 अर्थ :- नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र 

५) कितीही जोर लावला तरी बाटलीचे ------ उघडेना.
उत्तर :- तोंड
अर्थ :- बाटलीचे तोंड  म्हणजे बाटलीचे बूच  

६) चरवीतले दूध गंजात ओतले, तर ते गंजाच्या ----- पर्यंत आले.
उत्तर :- गळा
अर्थ :- गंजाचा गळा म्हणजे गंजाच्या वरची तोंडाजवळची बाजू 

७) सुईच्या -------- दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरु केली.
उत्तर :- नाक
  अर्थ :- सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. 

८) आंब्याच्या कोईचे ------- पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.
उत्तर :- केस
अर्थ :- आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू  

९) आपले शेकडो ------ पसरुन उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.
उत्तर :- हात
अर्थ :- वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या/ पारंब्या 

१०) खोलीतल्या एकमेव खुर्चीचा ------ मोडला होता. म्हणून मी जमिनीवर बसलो.
उत्तर :- पाय
अर्थ :- खुर्चीचा पाय  म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. 




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421