⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – ओळख भाज्यांची⚜
️शाळा बंद...पण शिक्षण आहे.
==========================
खेळात
या ठिकाणी काही वर्णने असलेली वाक्ये दिली आहेत. त्या वर्णनानुसार भाज्यांची नावे ओळखून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत
घेवू शकता आणि
आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उत्तरसूची
1) माणूस म्हणलं की होणारच = चुका
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई = करडी
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र = काशीफळ
4) याला 'ट' लावलं की झालं माकडाचं = .शेपू
5) यातला 'ब' काढला की बाय-बाय = बटाटा
6) याला कापलं कि यानं रडवलंच समजा = कांदा
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच
नाही = घोळ
8) पुण्या जवळून वाहणारी नदी = मुळा
9) सांभाळ करणारे = पालक
10) पाठ खरबड, खायची परवड = कारले
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं = भेंडी
12) फुल च, पण जरा जाडजूड आणि वेगळं = फ्लॉवर
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ = सिमला
मिर्ची
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या. = अंबाडी
15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी = भोपळा
16) लाडका नसला की सगळे म्हणतात = दोडका
17) उत्तम स्वयंपाक करणारीतला ग काढला की हि भाजी = सुरण
18) हिरवे हिरवे मणी, शेंगाच्या पोटात लपवूनी = मटार / हिरवा वाटाणा
19) गाल लाल झाले की याच्या सारखे होतात. = टॉमेटो
20) येताना आली हिरवा शालू नेसून, आता लाल पैठणीत बसली रुसून = मिरची
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421