हरतालिका
चांगला वर मिळावा, अखंड सौभाग्य प्राप्ती
व्हावी, घरातील सर्वांना आरोग्य व सुखसंपत्ती लाभावी व घराची भरभराट
व्हावी आणि मृत्यु नंतर कैलास लोक मिळुन मुक्ती लाभावी. यासाठी भाद्रपद शुध्द
तृतीयेला स्त्रियांनी शिवाची पुजा करण्याचा कुलाचार आहे्.
गौरीने शिव हा वर मिळावा यासाठी सांबाच्या पिंडीची जेथे पुजा
केली ती गुन्हा हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या गौर नावाच्या पर्वतवर आहे. येथे
हरताल नावाच्या वृक्षाचे उपवन आहे गौरी त्याच्या सानिध्यात त्यावेळी राहत होती
म्हणुन तिला 'हरितालिका' हे नाव पडलेले आहे.