⚜विद्याधन भाषिक उपक्रम – यमकदर्शक शब्द
⚜शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
या ठिकाणी
काही तीन तीन शब्दांचे गट दिले आहेत. प्रत्येक एका गटातील प्रत्येक शब्दाचे शेवटचे
दोन अक्षरे सारखेच आहेत. ती अक्षरे शोधून रिकाम्या जागी आपल्या वहीत लिहा आणि
आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत
घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
शब्द गट : ब
- -
,
श -
- , न - -
उत्तर : बहर, शहर,
नहर
उत्तरसूची
१) अ -
- , स - - , क - -
उत्तर : अमर, समर, कमर
२) खं - - , उ - - , ब - -
उत्तर : खंदक, उदक, बदक
३) च - - , टि - - , न - -
उत्तर : चकली, टिकली, नकली
४) मं - - , दं - - , ब - -
उत्तर : मंगल, दंगल, बगल
५) आ - - , ख - - , म - -
उत्तर : आनन, खनन, मनन
६) प - - , व - - , खै - -
उत्तर : परात, वरात, खैरात
७) म - - , श - - , च - -
उत्तर : मरण, शरण, चरण
८) को - - , ओ - - , स - -
उत्तर : कोरडा, ओरडा, सरडा
९) म - - , अ - - , भे - -
उत्तर : मसूर, असूर, भेसूर
१०) क - - , ख - - , अं - -
उत्तर : कबर, खबर, अंबर
११) मे - - , गा - - , न - -
उत्तर : मेजर, गाजर, नजर
१२) मा - - , सैं - - , बां - -
उत्तर : माधव, सैंधव, बांधव
१३) मुं - - , धुड - - , चिं - -
उत्तर : मुंगूस, धुडगूस, चिंगूस
१४) क - - , म - - , पा - -
उत्तर : कलम, मलम, पालम
१५) वि - - , अ - - , स - -
उत्तर : विज्ञान, अज्ञान, सज्ञान
१६) सु - - , भ्र - - , कां - -
उत्तर : सुतार, भ्रतार, कांतार
१७) धा - - , वा - - , च - -
उत्तर : धाटणी, वाटणी, चटणी
१८) ख - - , दं - - , क - -
उत्तर : खडक, दंडक, कडक
१९) वि - - , स्था - - , वा - -
उत्तर : विवर, स्थावर, वावर
२०) ध - - , टि - - , च - -
उत्तर : धमकी, टिमकी, चमकी
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421