⚜विद्याधन परिसर अभ्यास उपक्रम – सामान्यज्ञान
प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी सामान्यज्ञानावर आधारित तुम्हाला
माहित असलेले काही प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत
लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
उत्तरसूची
१) लोकरी कपड्यांची
जास्त गरज केव्हा असते ?
उत्तर :- हिवाळ्यात
२) भारतात साधारणतः
एका वर्षात किती ॠतू येतात ?
उत्तर :- तीन
३) सूर्याच्या
उष्णतेने पाण्याच्या वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर :- बाष्पीभवन
४) कोणत्या फळाची बी
फळाच्या बाहेर असते ?
उत्तर :- काजू
५) कोणत्या
झाडापासून कात तयार करतात ?
उत्तर :- खैर
६) समुद्राजवळील
प्रदेशात हवा कशी असते ?
उत्तर :- दमट
७) 'वाळवंटातील
जहाज ' असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उत्तर :- उंट
८) मोहाच्या
झाडाच्या कोणत्या भागापासून गावठी दारू बनते ?
उत्तर :- फुले
९) पावसासारख्या
पडणा-या बर्फाच्या लहानलहान खड्यांना काय म्हणतात ?
उत्तर :- गारा
१०) थंड प्रदेशातील
लोकांच्या आहारात कोणते पदार्थ जास्त असतात ?
उत्तर :- स्निग्ध व गोड
११) सूर्योदय
झाल्यावर हवेवर काय परिणाम होतो ?
उत्तर :- हवा उष्ण व्हायला लागते.
१२) जमिनीखाली
साठलेल्या पाण्यास काय म्हणतात ?
उत्तर :- भूजल
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
==============================