⚜️ ️विद्याधन भूगोल _जीवनदायिनी नद्या⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
==================================
या ठिकाणी काही वाक्ये दिली आहेत. प्रत्येक वाक्यात आपल्या जीवदायिनी
म्हणजे नद्यांची नावे लपलेली आहेत. त्या लपलेल्या नद्यांची नावे शोधून आपल्या वहीत
लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपल्या पालकांची,मित्रांची
मदत घेऊ शकता.
१) गोपाळराव यंदा आसावरीच्या लग्नाचा
जोरदार योग आहे बरं का..चिंता नको.
२) सरिता परत अपील करून काही फायदा नाही.
३) पैलवान सत्यपाल चा गंगा नगरीत मोठा
सत्कार झाला.
४) पूनम आमरस करणार आहे पण कर्णा घेऊन
सांगत सुटू नकोस.
५) कमांडो आज राजधानीत पंतप्रधानांची भेट
घेणार आहेत.
६) युवराजसिंग भल्याभल्यांना यष्टीचीत करत
असे.
७) उगीच काय, कोल्हा
कस काय येईल शहरात..
८) तेरे मेरे सपने देखकर मै सचमुच सपनों
में खो गई.. कल..रातसे
९) नीरज आज घसा खराब आहे रे जरा...
१०) पेंद्या वासुदेवाचा चड्डीयार होता..
११) कोलंबीचे कालवण केलंय नाना या खायला..
१२)अरे भो...गाडी लावायला जागाच नाही
वरती माझ्याशी भांडतोय लेकाचा...
१३) अबोलीचा गजरा घाल रीमा मॅचिंग आहे
तुझ्या ड्रेसला.
१४) प्रदूषणाला आवर घालायलाच हवा महाराजा..
१५) दारावर सणावाराला येणारे वासुदेव गायबच
झालेत...
१६) आप मुझे डॉंटो मत, वरना
मै निकल जाऊंगा...
१७) कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे यडप्या
शाम भटाची तट्टाणी...
१८) हे बघ मुली या घरचे कुळधर्म कुळाचार तूला समजायलाच हवेत..
१९) मुग्धा रोज डोंबिवली-ठाणेअप डाऊन करतेय...
२०) कर्तारसिंगवर बेधडक अफरातफरीचा दावा लावणार आहेत..
२१) काय करणार,मुले तिखट खात
नाहीत ना म्हणून लाडू केलेत...
२२) केसरकरांनी स्वयं शिस्तीचे कितीतरी जणांना धडे दिले...
२३) नर्म विनोदा साठी भाई एकदम प्रसिद्ध...
२४) कृतिका कैरीचे पन्हे पिऊन तृष्णा काही भागत नाही..
२५) दादा, मोरया
गोसावींची पालखी दरवर्षी येते ना?
*👉*संकलक*👈*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
=================================
उत्तरे:- १)गोदावरी, २)तापी, ३)पैनगंगा,गंगा, ४)पूर्णा, ५)मांजरा, ६)वसिष्टी, ७)उल्हास, ८)तेरेखोल, ९)नीरा, १०)पेंच, ११)कोयना, १२)भोगावती, १३)बोरी, १४)प्रवरा, १५)दारणा, १६)पवना, १७)इंद्रायणी, १८)मुळा, १९)मुठा, २०)सिंधफणा, २१)यमुना, २२)सरस्वती, २३)नर्मदा, २४)कृष्णा, २५)दामोदर