⚜️विद्याधन मराठी उपक्रम – शब्दसंपत्ती वरील प्रभूत्व⚜️

विद्याधन मराठी उपक्रम – शब्दसंपत्ती वरील प्रभूत्व

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

=======================

        या खेळात तुम्हाला दिलेल्या शब्दसमूहातील संकेतानुसार  असे चार अक्षरी शब्द शोधायचे आहेत की त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर फक्तअनुस्वार असेल. पहिल्या अक्षराला काना मात्रा ऊकार काही नसेल.  असे शब्द शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांचीमित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.

उदा:- 

संकेत :- जमिनीखाली येणारी भाजी

उत्तर :- कंदमुळ

उत्तरसूची 

१) ग्रहणाचा एक प्रकार   =  खंडग्रास

२) कचर्याची गाडी   =  घंटागाडी

३) शंकराचे एक नाव   =  चंद्रमौळी

४) देवासमोर अखंड लावायचा दिवा   =  नंदादीप

५) पूज्य   =  वंदनीय

६) खुप गार   =  थंडगार

७) कैदी   =  बंदीवान

८) साष्टांग नमस्कार   =  दंडवत

९) गंगेचे पाणी  =  गंगाजल

१०) विद्रोह करणारा   =  बंडखोर

११) एक रोग   =  गंडमाळा

१२) संघाचे हे खुप शिस्तबद्ध असते   =  संचलन

१३) सांज   =  संध्याकाळ

१४) गणपतीचा प्रसाद   =  पंचखाद्य

१५) रावण   =  लंकाधीश

१६) राजकपुरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी =  मंदाकिनी

१७) रांगोळी   =  रंगावली

१८) गाढव   =  लंबकर्ण

१९) रावणाची बायको  =  मंदोदरी

२०) गणपतीचे एक नाव   =  लंबोदर

२१) हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान   =  गंडस्थल

२२) तामिळनाडुतील एक जिल्हा   =  तंजावर

२३) एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे  =  गंधवार्ता

२४) काळोख   =  अंध:कार

२५) कुळाची यादी   =  वंशावळ

२६) साठवुन ठेवलेले पैसे   =  गंगाजळी


संकलक

श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421