⚜विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*
===========================
या
ठिकाणी आपल्याला काही मराठी/ इंग्रजी शब्द समूह दिले आहेत. त्या प्रत्येक शब्दसमुहासाठी एक शब्द
आपणास शोधायचा आहे. तो प्रत्येक शब्दात किती अक्षरे आहे हे त्या पुढील कंसात दिले
आहे. त्या शब्दाच्या मागे पुढे अक्षर लावून एक तयार होणारा नवीन शब्द हा किराणा
यादीतील शब्द आहे. चला तर मग किराणा
मालाची यादी तयार करून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी
पाठवा. यासाठी आपण आपल्या पालकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता व आपले भाषिक
ज्ञान वाढवू शकता.
उदा.:-
शब्दसमूह :- पलंगाचा
एक प्रकार (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :- बाज
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- बाजरी.
उत्तरसूची
1) ओझे वहाणारा प्राणी (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
खर
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द :- साखर
2) ग्रामीण भाषेत होकार (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
हा
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- चहा
3) शैक्षणिक संस्थेत भरावे लागणारे शुल्क (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
फी
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- कॉफी
4) छान याअर्थी एक उद्गार
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
वा
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द :- वाल, रवा
5) मराठीत नवऱ्याचा उल्लेख
करायचा एकाक्षरी शब्द (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
हे
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- पोहे
6) World Health Organization (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
हू
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- गहू
7) बारीक तुकडा (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
कणी
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- कणीक
8) वर्ष (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
सन
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- बेसन
9) असा निराशावादी स्वभाव चांगला Organised (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
वेल
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- वेलची
10) काठ, किनारा (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
तट
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- मेतकूट
11) साहेब चा अपभ्रंश (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
साब
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- साबण
12) They (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
ते
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- तेल
13) You (1)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
तू
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- तूप
14) एक शिवी / मेहुणा (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :-
साला
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- मसाला
15) भीमाचे शस्त्र (2)
शब्दसमूहासाठी येणारा शब्द :- गदा
मागे पुढे अक्षर लावून तयार होणारा शब्द
:- शेंगदाणे
*संकलक व निर्मिती*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421