⚜️यश⚜️

 यश

     थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणाराते सुखमय करणारा हा संशोधक. सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे. अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे. अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला. त्यावेळी भेटावयासत्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले, 'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?" 'एक हजार...' एडिसन म्हणाला. त्यांना पुन्हा विचारण्यात आले, 'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत. प्रत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाहीहेच मला कळल.'

तात्‍पर्य:- अपयश ही यशाची पहिली पायरी असते.