⚜️ उतारा क्र. 1 उत्तरसूची⚜️

 

⚜️ उतारा क्र. 1⚜️ 

 खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

        हेमा आपल्या बिछान्यावर तिच्या खोलीच्या छताला चिकटवलेल्या चांदण्यांकडे पहात पडली होती. तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. तेच कपडे ती आलटून पालटून घालत होती. पण एकतर ते फार घट्ट होते किंवा फार तोकडे होते. कपड्यांनी भरलेले कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हते. मग तिला एक अफलातून कल्पना सूचली, तिचे डोळे चमकले आणि ती आपल्या आईच्या खोलीकडे पळाली . आई गं, मला नवीन कपडे हवेत  ती म्हणाली . पण माझे सगळे जुने कपडे दान करुन टाकल्यानंतरच आता जास्त कपड्यांचा ढीग जमवायचा नाही. तिच्या आईने स्मित केलं आणि तिला जवळ घेतले. तिची मुलगी दयाळू होती तर !

1) हेमा आपल्या बिछान्यावर पडली होती कारण ती :
1) दमली होती     
2) चांदण्याकडे आवडीने पहात होती.
3) तिला कोणते कपडे घालावे कळत नव्हते     4) ती आळशी मुलगी होती.

2)      तिला आपल्या कपड्यांपैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते कारण,
1) ते फॅशनेबल नव्हते.    
2) ते फार भडक रंगाचे होते.
3) तिला निवड करता येत नव्हती.    4) त्यापैकी  कुठलेच कपडे तिला बरोबर नीट बसत नव्हते.

3)‘कपड्यांचा ढीग जमवायचा’ याचा समानार्थी शब्द :
1) कपडे साठवायचे     
2) कपडे वाटायचे
3) कपडे भागीत वापरायचे      4) कपडे देऊन टाकायचे

4)‘दान करणे’ याचा विरुध्दार्थी शब्द आहे :
1) देणे        
2) स्वीकारणे  
3)  नाकारणे    4) खर्च करणे.

5) हेमा आहे :
1)अधाशी     
2) दानशूर
3) आपमतलबी    4) कंजूष