⚜️उतारा क्र. 2⚜️

⚜️ खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

          एकदा एक व्यापारी भगवान बुद्धांकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धाना शिव्यांची लाखोली वाहिली, पण भगवान बुद्ध काहीच बोलले नाहीत. 
    जेव्हा व्यापाऱ्याने शिव्या देण्याचे थांबविले तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला विचारले, "तू तुझ्या घरी कधी पाहुण्यांचे आदरातिथ्य करतोस का ?" तो व्यापारी म्हणाला, "हो, करतो तर !" 
     मग भगवान बुद्धांनी विचारले,"तू त्यांना काही खायला देतोस का ?" 
      तो व्यापारी म्हणाला, "होय." 
    नंतर भगवानांनी त्याला पून्हा विचारले, “तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्विकारले नाही तर तू काय करतोस ?" 
   तो व्यापारी उत्तरला, "काय हास्यास्पद प्रश्न आहे हाजर त्यांनी त्याचा स्विकार केला नाही तर आम्ही त्यांना खायला दिलेले आमच्याकडेच राहते."
 मग भगवान बुद्ध हळूवार आवाजात म्हणाले," तू आता मला जे दिलेस ते तुझ्याजवळच राहिले." 
    त्या व्यापाऱ्याला लाज वाटली आणि भविष्यात कधीही घाणेरडी भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा त्याने केली.

प्रश्न :- 
1) व्यापाऱ्याने शिव्यांची लाखोली वाहिली, तेव्हा भगवान बुद्ध....... 
(1)
फक्त हसले.    (2) काहीच बोलले नाहीत.    
(3) खूप चिडले.    (4) प्रश्न विचारू लागले.

2) आपण दुसऱ्यास दिलेले त्याने स्विकारले नाही तर काय होते
(1)
ते वाया जाते.    (2) त्यामुळे आपला अपमान होतो.    
(3)ते आपल्या जवळच राहते.    ( 4 ) त्यामुळे आपला फायदा होतो.

३) व्यापाऱ्याला लाज वाटली, कारण...........

(1 ) त्याचा स्वभाव लाजरा होता.    (2) भगवान बुद्ध हळू आवाजात बोलले.
(3)त्याला आपली चूक समजली.    (4) बुद्धांनी शिव्यांचा स्विकार केला नाही.