⚜️मुंगी⚜️
मुंगी हा एक लहानसा कीटक आहे. मुंगी हा कीटक आपल्याला सगळीकडे आढळतो. मुंगी हा कीटक संघटना करून राहतो. मुंगी हो सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे. मुंग्यांची रांगच आढळते. मुंग्या अहोरात्र आपले नेमून दिलेले काम करताना आढळतात. मुंग्या आपल्या सहकाऱ्यांशी न भांडता समंजसपणे स्वत:साठी व आपल्या सहकाऱ्यांसाठी कामे करीत असतात. एखादा मार्ग बंद झाल्यास मुंग्या अडून थांबत नाहीत. त्या दुसरा मार्ग शोधून आपले काम सुरू करतात. मुंग्या सर्वांसाठीच निवारा तयार करतात. सर्वांसाठीच अन्न मिळवून साठवितात. मुंग्यांकडे आळस, स्वार्थ, कामचुकारपणा हे गुण आढळत नाहीत. मुंग्यांकडे पाहून आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी शिकता येतात.