⚜️ताक⚜️

 ⚜️ताक⚜️

    दूध हा आपला अन्नपदार्थ आहे. ते आपल्याला गाय, म्हैस, शेळी व आणखी काही प्राण्यांपासून मिळते. दूध हा पांढराशुभ्र द्रवपदार्थ आहे. दुधापासून दही व दही घुसळून ताक तयार केले जाते. दूध आणि दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण अन्न म्हणून वापरतो. दुधाची चव व ताकाची चव वेगवेगळी असते. दुधाचे व ताकाचे काही गुणधर्मही वेगवेगळे असतात. रंगाने दूध व ताक एकसारखेच असते. दुधापासूनच ताक तयार होते. परंतु त्यांच्या गुणधर्मांतील फरकांमुळे दूध हे दूधच व ताक हे ताक असते. वरून सारख्या दिसणाऱ्या गोष्टी असल्या; तरी त्यांच्या गुणांमुळे त्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. तुरटीचे खडे व खडीसाखरेचे खडे सारखेच दिसतात. पण त्यांचे गुण वेगवेगळे असतात. अशा सारख्या दिसणाऱ्या पण गुणांनी वेगळ्या असणाऱ्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी 'ताक ते ताक, दूध ते दूध' या म्हणीचा वापर करतात.