⚜️पक्ष्यांचे निवारे⚜️

 ⚜️पक्ष्यांचे निवारे⚜️

       बहुतेक पक्षी उडणारे असतात. कोंबडी, मोर, शहामृग असे काही पक्षी दूरवर उडू शकत नाहीत. चिमणी, घार, साळुंकी असे पक्षी घरटी बांधतात. प्रत्येक पक्षी एकसारखेच घरटे बांधतो असे नाही. काही पक्ष्यांची घरटी आडोश्याला घमेल्यासारखी असतात. काही पक्ष्यांची घरटी बंदिस्त असतात. घरट्यात जाण्यासाठी फक्त थोडी जागा उघडी असते. काही पक्षी घराच्या वळचणीला, तर काही पक्षी झाडावर घरटी बांधतात. काही पक्षी इमारतींच्या भिंतीत असणारी बिळे, झाडांच्या ढोली हाच आपला निवारा बनवतात. कोंबडी हा पाळीव पक्षी आहे. कोंबडीसाठी माणसाने खुराडे हा निवारा तयार केला आहे. मोरासारखे पक्षी झाडाच्या फांदीवर अथवा दाट झाडाझुडपांत विश्रांती घेतात. काही पक्ष्यांची घरटी जमिनीवरही आढळतात.