⚜️संकल्प⚜️
एकदा डिसेंबरमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांची सभा घेतली. "प्रत्येकाने आपण अधिक चांगले शिक्षक कसे होऊ, या संदर्भात नवीन वर्षासाठी संकल्प तयार करावा. मी तो आपल्या स्टाफबोर्डवर लावीन असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापला नवीन वर्षाचा संकल्प तयार केला. सर्व संकल्प नावानिशी लावण्यात आले.
एवढ्यात एक शिक्षक आले व हेडमास्तरांच्या नावे वाटेल ते बोलू लागले. "माझा संकल्प येथे लावलेला नाही, हेडमास्तर पक्षपाती आहेत, स्वतःला ते काय समजतात,' असे त्यांचे अद्वातद्वा बोलणे ऐकून हेडमास्तर तेथे आले व म्हणाले, "अनवधानाने माझ्याकडून तो राहून गेला. हा बघा मी तो लावायला आणला आहे. सर्वांनी तो उत्सुकतेने वाचला. संकल्प होता, "मी कोणत्याही परिस्थितीत माझे मन शांत ठेवीन. मनाविरुध्द घडले तरी कधीही अस्वस्थ होणार नाही.'
तात्पर्य: - संकल्प हे फक्त करण्यासाठी नसतात तर ते आचरणासाठी असतात.