⚜️पाटी⚜️
ही माझी पाटी आहे. जून महिन्यात नवीन घेतली आहे. दुकानात वेगवेगळ्या पाट्या विकायला होत्या. पाटीबरोबर पेन्सिल, पट्टी विकत घेतली. मी दररोज पाटीवर लिहिते. पाटीवर चित्र काढते. पाटी पुसायला डबीत ओल्या कापडाची घडी ठेवते. त्याने पाटी स्वच्छ करते. पाटीवरचे सुंदर अक्षर, चित्रे पाहून मला खूप आनंद होतो. अशी आहे माझी छान पाटी !