⚜️उतारा वाचन भाग ३५⚜️
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. आपण त्यांना 'राष्ट्रपिता', 'महात्मा' म्हणतो. त्यांची राहणी साधी. पोशाख साधा. खादीचे आखूड धोतर. पायात वहाणा. हातात काठी. डोळ्यांवर गोल चश्मा. कमरेला गोल घड्याळ. गांधीजी आश्रमात राहत. पहाटे लवकर उठत. स्वतः चे काम स्वतः करत. ते चरख्यावर सूत कात. गांधीजींना मुले खूप आवडत. गांधीजी मुलांबरोबर खेळत. गांधीजींनी आश्रमात शाळा काढली होती. तेथे वाचणे लिहिणे शिकवले जाई. तसेच जीवनासाठी उपयोगी शिक्षण दिले जाई. गांधीजींनी त्याला 'नई तालीम' असे नाव दिले होते. मुले प्रेमाने गांधीजींना 'बापू' म्हणत.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय होते ?
२) आपण म. गांधीजींना काय म्हणतो ?
३) महात्मा गांधीजीची राहणी कशी होती ?
४) गांधीजी कोठे राहत ?
५) मुले कोणाला आवडायची ?
६) मुलांबरोबर कोण खेळत असे ?
७) आश्रमात शाळा कोणी काढली होती ?
८) आश्रमातील शाळेत काय शिकवले जाई ?
९) आश्रमातील शाळेला म. गांधीजींनी काय नाव दिले होते ?
१०) मुले प्रेमाने गांधीजींना काय म्हणत ?
११) महात्मा गांधीजींविषयी अधिक माहिती मिळवून वाचा.