⚜️उतारा वाचन भाग ६९⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ६९⚜️

       दिवाळी गेली. थंडीचे दिवस जवळ आले. थंडी कडाक्याची पडू लागली.या थंडीने लोकांचे ओठ फुटू लागले. टाचांना भेगा पडू लागल्या. सकाळ संध्याकाळ जाळ करून लोकं शेकत बसू लागले. थंडीचा कडाका वाढला. ज्वारीच्या कणसात दाणा भरू लागला. टपोरी कणसे भरदार दिसू लागले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) उताऱ्यात कोणत्या सणाचा उल्लेख आला आहे ?
२) कशामूळे लोकांचे ओठ फुटू लागले ?
३) कशाला भेगा पडू लागल्या ?
४) लोक कधी शेकत बसू लागले ?
५) कशाचा कडाका वाढला ?
६) कशात दाणा भरू लागला ?
७) टपोरी कणसे कशी दिसू लागली
८) थंडीचा काय परीणाम लोकांवर झाला ?
९) कोणता सण गेल्यावर थंडी जास्त पडते ?
१०) थंडी कोणत्या ऋतूत असते ?
११) मुख्य ऋतू किती व कोणते ?
१२) 'कणसात' या शब्दात कोणता अंक दडलेला आहे ?
१३) 'कणीस' या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
१४) 'भरदार' या शब्दासारखे अजून शब्द लिहा.
१५) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?