⚜️उतारा वाचन भाग ३९⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ३९⚜️

  एक होता ससा. एकदा जंगलात फिरत असताना त्याला जांभळाचे झाड दिसले जांभळं पाहून सशाला ती खाण्याची इच्छा झाली . जवळच सशाने बांबूचा ढिग पाहिला. त्याने दोन बांबू घेतले. सशाने बांबू झाडाला उभे केले. बांबूवर ससा उंच चढला आणि जांभळं तोडली. जांभळं खाऊन ससा खुश झाला.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) कोणाला जंगलात जांभळाचे झाड दिसले ?
२) सशाला काय खाण्याची इच्छा झाली ?
३) ससा कोठे फिरत होता ?
४) जवळच सशाने काय पाहिले ?
५) सशाने बांबूच्या ढिगातून किती बांबू घेतले ?
६) सशाने बांबू कोठे लावले ?
७) काय खाऊन ससा खुश झाला ?
८) जांभळं कोणत्या रंगाची असतात ? 
९) तुम्हांला आवडणाऱ्या फळांची नावे सांगा.
१०) तुम्हांला कोणकोणते प्राणी आवडतात ते लिहा.
११) 'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
१२) 'खुश होणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.